नगराध्यक्षांच्या हस्ते प्रारंभ
बीड । वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी बीड नगरपरिषदेने दहा मुख्यठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर पाण्याच्या टाक्या उभारल्या असून आज नगर नाका, अंबिका चौक, बस स्टँड समोरील पोलिस चौकी, माळीवेस आदी भागात टाक्या बसवण्यात आल्या व नागरिकांना त्या ठिकाणी हँडवॉश व साबनाने हाथ धुवण्याची व्यवस्था केली. याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते तसेच उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न प तर्फे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून शहराच्या मुख्य चौकात नागरिकांना हात धुण्यासाठी पाण्यासह हॅन्ड वॉश साबण ठेवण्यात येत आहे प्रत्येक नागरिकाने येता जाता हात स्वछ धुऊन घ्यावेत व कोरोना विषाणू पासून संरक्षण करावे तसेच परिसर स्वछता ठेऊन पालिकेच्या कचरा गाड्यातच कचरा टाकावा,पालिकेने सतर्कता बाळगण्याने आज कोरोना पासून आपण अलिप्त आहोत अशीच काळजी घेऊन या संकटाचा मुकाबला करावा असे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगरसेवक भास्करराव जाधव, किशोर पिंगळे, माजी नगरसेवक सुभाष सपकाळ, सभापती राजेंद्र काळे, बाबुराव दुधाळ,मनोज अग्रवाल, माजी नगरसेवक सुमंत रुईकर, नितीन साखरे आदी उपस्थित होते.
Leave a comment