बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यालगत असलेल्या जामखेडमध्ये काल कोरोनो पॉझीटीव्ह रूग्ण आढळल्याने नगरहुन बीडकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत, एवढेच नव्हे तर आष्टी तालुक्यातील नगर जिल्ह्यातील सरहद्दीवर असलेल्या सहा गावांमध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था करण्यात आली असून संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही सहाही गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे.
जामखेड (ता.अहमदनगर) येथे कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी (दि.23) आष्टी तालुक्यातील सहा गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सहाही गावांमध्ये संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी करण्यात येणार आहे.याबाबतचा एक आदेशही त्यांनी जारी केला आहे. अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आलेल्या गावांमध्ये हरिनारायण आष्टा, शिंदेवस्ती, चिंचपूर, भातोडी, करेवडगाव, मातकुळीचा समावेश आहे. जामखेडपासून ही सर्व गावे चार कि.मी. अंतरावर असल्यामुळे हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. (संग्रहित फोटो)
Leave a comment