अंबाजोगाई  । वार्ताहर

विहिरीत बुडणाऱ्या दोन वर्षीय जहिरला वाचवून जीवदान देणा-या अथर्व जहागिरदारचा राजकिशोर मोदींनी बुधवार,दिनांक 22 एप्रिल रोजी सत्कार केला. याबाबतची  माहिती अशी की,शहरातील रविवार पेठ भागातील एक दोन वर्षीय बालक खेळत-खेळत विहिरीजवळ गेला. विहिरीच्या पाय-या उतरत आत गेला असता तो पाण्यात कोसळला.शेजारी राहणा-या महिलेला त्या बालकाचा आवाज कानावर आला.कसलीही जीवाची पर्वा न करता अथर्व जहागिरदारने पाण्यात उडी मारून त्या दोन वर्षीय बालकाला पाण्याबाहेर काढले व त्याला जीवदान दिले.हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच वाजता रविवार पेठ परिसरातील सरस्वती तीर्थ येथे घडला. येथील रविवार पेठ परिसरात बालाजी मंदिर परिसरात सरस्वती तीर्थ नावाची जुनी विहिर आहे. ही विहिर प्राचीन काळातील असून या विहिर आहे. विहीरीला कसलेही कठडे नाहीत.रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारा सय्यद जहिर सय्यद हाफीस (वय- 2 वर्षे) हा बालक खेळत खेळत विहिरीकडे गेला. विहिरीच्या पाय-या उतरत उतरत तो खाली उतरला. अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्यात पडत असतांना त्याचा मोठा आवाज झाला. विहिरीच्या शेजारी राहणा-या प्रणिता विनय जहागिरदार यांनी त्या बालकाचा आवाज ऐकला. त्यांनी आपला मुलगा अथर्व यास तात्काळ ही माहिती दिली.अथर्वनेही कसलाही विचार न करता विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडणा-या त्या बालकांस बाहेर काढले व त्याचा जीव वाचविला.अर्थव विनय जहागिरदार हा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे.त्याच्या या धाडसाची माहीती कळताच बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्याचे कौतुक करून शाल,पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून त्याचा सत्कार केला.यावेळी नगरसेवक मनोज लखेरा,सुनील व्यवहारे,राणा चव्हाण,विवेक जहागीरदार, विनय जहागीरदार,डॉ.नंदकिशोर फुलारी,आनंद टाकळकर आदींची उपस्थिती होती.

अथर्व जहागिरदारच्या धाडसाचे कौतुक..!

अंबाजोगाई शहर हे गुणवंत व धाडसी युवकांची खाण आहे.रविवारी शहरातील रविवार पेठ परिसरात राहणारा सय्यद जहिर सय्यद हाफीस (वय-2 वर्षे) हा बालक खेळत खेळत विहिरीकडे गेला.अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला.विहिरीच्या शेजारी राहणा-या प्रणिता विनय जहागिरदार यांनी त्या बालकाचा आवाज ऐकला. त्यांनी आपला मुलगा अथर्व यास तात्काळ ही माहिती दिली.अथर्वनेही कसलाही विचार न करता विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडणा-या त्या बालकांस बाहेर काढले व त्याचा जीव वाचविला.अथर्व विनय जहागिरदार याच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अशा युवकाचा अंबानगरीला सार्थ अभिमान आहे.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.