नगरमध्ये उपचार सुरु; आज दुसर्यांदा स्वॅब घेणार
बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील मौजे पिंपळा येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. त्याच्यावर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात मागील 14 दिवसांपासून वैद्यकीय अधिकार्यांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत. दरम्यान नगर येथील या पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला फॉलोअप सॅम्पल निगेटिव्ह आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली. दरम्यान आज गुरुवारी या रुग्णाचा दुसर्यांदा स्वॅब घेतला जाणार आहे.
पिंपळा (ता.आष्टी) येथील रुग्णाच्या गाव परिसरातील धनगरवाडी, काकडवाडी, खरडगव्हाण, सुंबेवाडी, नांदूर, लोणी, कोयाळ, कुंटेफळ, सोलापूरवाडी, ठोबळसांगवी, या गावात मागील तेरा दिवसांपासून सर्वेक्षण केले जात आहे. 2620 घरांचा सर्व्हे करत 12 हजार 345 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 36 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे तर 59 जण 59 जण संस्थात्मक अलगिककरणात आहेत. बुधवारी सहा जण विलगीकरण कक्षात दाखल झाले. आष्टी तालुक्यातील पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका रुग्णावर नगरमध्ये उपचार सुरु आहेत. चौदा दिवसानंतर घेतलेला त्या रुग्णाचा स्वॅब नमुना कोरोना निगेटिव्ह आला त्यामुळे आणखी एकदा त्याचा स्बॅब तपासणीसाठी पाठवला जाईल असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
Leave a comment