आष्टी । वार्ताहर
येथील शासकीय रूग्णालय परिसरात रूग्णवाहिका फोडुन नंतर डिझेल टाकुन ही रूग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न झाला होता. मंगळवारी (दि.21) घडलेल्या या घटनेप्रकरणी एका महिलेसह तिच्या सोबतच्या अनोळखी तीन पुरूष नातेवाईकांविरूद्ध आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सय्यद शहाबाज रज्जाक (रा.मुर्शदपुर) या रूग्णवाहिका चालकाने याबाबत तक्रार नोंदवली. रूग्णवाहिकेतील महिला रूग्णासोबत असलेल्या सुमन अंबादास येरकळ या महिलेसह तिच्या तीन पुरूष नातेवाईकांनी मंगळवारी आष्टी शासकीय रूग्णालय परिसरात रूग्णवाहिकेवर (क्रं.एम.एच.14-सी.एल.0934) दगडफेक करत डिझेल टाकुन ही रूग्णवाहिका पेटवुन देवुन शासकीय रूग्णवाहिकेचे नुकसान केले. त्यावरून वरील लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पो.नि. माधव सुर्यवंशी पुढील तपास करत आहेत.
Leave a comment