परळी । वार्ताहर
शेतातील पाईप, विद्युत पंप, कडबा व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना सुरनरवाडी (ता.धारूर) येथे घडली. दरम्यान याप्रकरणात दोन गटातील लोकांनी चोरीप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दिल्याने सिरसाळा ठाण्यात दोन्ही गटातील पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला.
संपत सिताराम करे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या सुरनरवाडी शेत गट क्रमांक 121 मधील 20 पीयुसी पाईप, ज्वारीच्या कडब्याच्या दोनशे पेंड्या असा मुद्देमाल चोरून नेला. म्हणून अशोक करे, विनायक करे, मधुकर करे, सुधाकर करे, दत्तु करे, दिपक करे, सुदीप करे (सर्व रा. सुरनरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसर्या गटातील अशोक करे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेत गट नंबर 115 मधील शिवारातून आरोपींनी एक 10 हजार किमतीचा विद्युत पंप चोरून नेला. यावरून संपत्ती करे, सिताराम करे, मुक्तीराम करे, अनंत करे, शिवाजी काळे, दासा करे, कारभारी करनर व विष्णु करे या आठ जणांवर गुन्हा दाखल झाला. या दोन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार कुरेवाड करत आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment