तलवाडा । वार्ताहर
तलवाडा परिसरातील बोरगावथडी-गंगावाडी व राजापुरातील साठ्याच्या वाळूला सोन्यापेक्षाही मोठा भाव आलेला असून महसुल विभागाचे कर्मचारी व पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम अवैध वाळूची विक्री करण्यात आहे. पोलिसांच्या आशिर्वादाने वाळूची विक्री होत असल्याने कारवाई कोण करणार असा प्रश्न लोकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान परिसरात भुरट्या चोर्याही वाढल्या आहेत.
वाळू माफियामुळ गोदाकाठ बदनाम झालेला आसतांना बोरगावथडी,गंगावाडी, राजापुर व तलवाडा गावा शेजारी अनेक अवैध वाळूचे साठे निर्माण झालेले आहेत. सध्या गोदावरी तुडूंब भरलेली आसल्याने साठ्याच्या वाळूला मोठ्या प्रमाणात जणूकाही सोन्याचा भाव आलेला आहे. तलवाडा व परिसरात असलेल्या साठयाची वाळू राजरोसपणे विक्री होत आसतांना पोलिस व महसूल विभागाने डोळेझाक कशामुळे केली असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तसेच बनावट विदेशी दारू विक्री बिनबोभाटपणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे कोरोनाचा गैर फायदा घेत तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत भुरट्या चोरांचा सुळसुळाटात कमालीची वाढ झालेली असुन तक्रार करणार्या नागरिकावर पोलीस भडकत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असुन या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी जातीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी तलवाडा व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Leave a comment