केज । वार्ताहर

राज्य शासनाच्या आदेशानुसार साखर कारखान्यावर ऊस तोडणी करणारे मजूर त्यांच्या मूळ गावी परतू लागले असून जिल्हा व तालुका प्रशासन सतर्क झाले असून सर्व दक्षता घेतली जात आहे.तालुक्यातील ऊस तोडणी करणारे मजूर हे लॉकडाऊन मुळे वेगवेगळ्या कारखान्यावर अडकून पडले होते त्यांना आता मुळगावी परतता येत आहे.

उसतोड मजूर त्यांच्या मूळगावी परत आले तरी त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये. त्यांनी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीचे सर्व अधिकारी दक्ष आहेत. तहसीलदार दुलाजी मेंढके, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आठवले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरुणा केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी हे परिश्रम घेत आहेत. ऊसतोड मजुरांची तपासणी व त्यांच्या व्यवस्था केली जात आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.