धारुर । वार्ताहार
कोरोना विषाणू संसर्गाची लागण देशभरात झाली असल्याने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. या विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी किल्ले धारूर रोटरी क्लबच्या वतीने आज शहरातील गोरगरीब व गरजूवंत लोकांना घरपोच मेडिकल किट त्यामध्ये 1 मास्क, 1 सनेटायजर, 1साबण आणि 1 हँडवास पॉकिट असे 600 किट तयार करून वाटप करण्यात येत आहे. अशोकनगर पासून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास तहसिलदार शिडोळकर मॅडम, पोलिस निरीक्षक धस मॅडम, किल्ले धारूर नगरीचे नगराध्यक्ष डॉ.हजारी, मुख्याधिकारी सुहास हजारे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.चेतन आदमाने साहेब, नायब तहसिलदार विटेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
किल्ले धारूर रोटरी क्लबचे रोटरी अध्यक्ष अमोल गुळवे, सचिव विजयसिंह दिख्खत, आनंद पिलाजी, अनिल चिद्रवार, दपक गुळवे, नगरसेवक राजू कोमटवार, नगरसेवक रुपेश चिद्रवार , सतिशसेठ पिलाजी, निलेश डुबे, गजानन डुबे, मदनमोहनजी खंडेलवाल, पंजाब शिनगारे, संदिपानजी तोंडे आणि कायाकल्प फाऊंडेशनचे दिनेश कापसे, प्रा.विजय शिनगारे, विश्वानंद तोष्णिवाल नगरसेवक बालासाहेब चव्हाण तसेच जेष्ठ पत्रकार प्रकाश काळे, सुनिल कावळे, अतुल शिनगारे, नाथा ढगे, सचिन थोरात, पत्रकार तथा युथ क्लबचे सुर्यकांत जगताप, पत्रकार रवि गायसमुद्रे सर्व पत्रकार बांधव, अनेक मान्यवर व अशोकनगर परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होते.
Leave a comment