आष्टी । रघुनाथ कर्डिले
सध्या कोरोना महामारी मुळे सर्वत्र हाहाःकार उडालेला आहे अशा गंभीर परीस्थितीत आपल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र परीश्रम घेऊन अक्षरशः मास्कपासुन ते निर्जतुकीकरणापर्यंत औषधी आणि अशा परिस्थीतीत कोणी गरजवंत कुटुंब उपाशी राहणार नाही यासाठी घरगुती किराणा व हे सर्व स्वखर्चतुन उभा करुन आ. सुरेश धस यांनी शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता विविध उपयायोजना सुरु करुन आदर्श असा धस पॅटर्न सर्वासमोर ठेवला आहे , त्या मुळे आता आ.सुरेश धस हे या संकटकाळातील खर्या अर्थाने योद्धाच ठरत आहेत.
कोरोना चे सावट आता दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे अशा परीस्थितीत आष्टी/पाटोदा/ शिरुर या अत्यंत मोठया असलेल्या मतदार संघात प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा राबवायच्या या साठी आ. सुरेश धस यांनी सुरुवातीपासुनच अत्यंत नियोजनबद्ध काम सुरु केले आहे .
या तिन्ही शहराच्या नगरपंचायतींसह जवळपास बहुतांश संस्था आ.धस यांच्या ताब्यात आहेत.सुरूवातीलाच प्रत्येक ठिकाणी स्वतः जावुन संबंधित यंत्रणा व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी वेगवेगळ्या माध्यमातुन संवाद साधत सर्व आवश्यक त्या सुचना देत वेगवेगळी जबाबदारी सोपवली.अगदी गरजुंसाठी किराणा व अन्नधांन्यापासुन ते मास्क व निर्जंतुकीकरण फवारणीपर्यंत सर्व यंत्रणा ही कोणत्याही निधीची वाट न बघता स्वखर्चातुन उभी करण्याचे नियोजन केले.
शहरातील प्रत्येक प्रभागात जंतूनाशक औषधांची फवारणी करून निर्जतुकीकरण केले गेले.शहरातील सर्व प्रमुख रस्ते हे अक्षरशः फिनेल ने धुतले गेले.प्रत्येक आठ ते दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी अशा सुचना संबंधित पंचायत समिती,नगरपंचायत प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईड चा वापर करण्यात आला.तसेच घरगुती निर्जतुकीकरणासाठीही प्रत्येक घरात सोडीयम हायपोक्लोराईडचे वाटप केले.तसेच त्याचा वापर कसा करायचा याच्याही सुचना खुद्द आ. धस यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जनतेला दिल्या.
कोरोना संसर्गा पासुन बचावासाठी आवश्यक असणार्या तब्बल दिड लाखांच्या वर कापडी मास्क आ. धस यांनी तातडीने तयार करून घेत शहरासह मतदारसंघातील खेड्यापाड्यात ही यंत्रणेच्या माध्यमातुन घरोघरी वाटप केले यामुळे कोरोनाच्या काळातही महिलांसाठी घरबसल्या रोजगार निर्मिती मिळू लागली.अजुनही हे काम सुरु आहे.
पोलीसांसाठी सुरक्षा गॉगल्स
नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र मेहनत घेणार्या पोलीसांसाठीही आ. धस यांनी स्वखर्चातुन पुढाकार घेत उच्च दर्जाचे चारशेच्या वर सुरक्षा गॉगल्स दिले, मास्क व सॅनिटायजर देखील उपलब्ध केले.
आष्टीत सॅनिटायझर स्प्रे ची यंत्रणा
शहरात नव्याने दाखल होणारी वाहने , माणसे , पोलीसांची वाहने सॅनिटाईज करण्यासाठी आ. धस यांनी आष्टीत सॅनिटायजर स्प्रे ची यंत्रणा सुरू केली व स्वतः चाचणी घेतली आता ही यंत्रणा इतर शहरांमध्येही सुरू होत आहे.
Leave a comment