नगरमध्ये उपचार घेणार्‍या पिंपळ्याच्या रुग्णाला 14 दिवस पूर्ण 

बीड । वार्ताहर

कोरोना संशयितांसाठी स्थापन करण्यात आलेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात (विलगीकरण कक्ष) आज बुधवारी (दि.22) तीन नवीन संशयित दाखल झाले. त्या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. आज सायंकाळपर्यंत हे तीन रिपोर्ट प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

जिल्ह्यात बीडसह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. आतापर्यंत आजच्या तीन जणांसह जिल्ह्यात एकुण 167 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यात बीड जिल्हा रुग्णालयात 125 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात 42 जणांचा समावेश आहे. यापैकी जिल्हा रुग्णालयातील 122 तर स्वारातीमधील 42 असे एकुण 164 रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला आहे. 

पिंपळ्याच्या रुग्णावर अहमदनगरला  उपचार

दरम्यान आष्टी तालुक्यातील मौजे पिंपळा येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. त्याच्यावर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात मागील 13 दिवसांपासून वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत. तो रुग्ण नगरच्या आयसोलेशन वार्डात दाखल आहे. 

पिंपळा परिसरातील गावांचे सर्व्हेक्षण 

पिंपळा (ता.आष्टी) येथील रुग्णाच्या गाव परिसरातील धनगरवाडी, काकडवाडी, खरडगव्हाण, सुंबेवाडी, नांदूर, लोणी, कोयाळ, कुंटेफळ, सोलापूरवाडी, ठोबळसांगवी, या गावात मागील तेरा दिवसांपासून सर्वेक्षण केले जात आहे. 2620 घरांचा सर्व्हे करत 12 हजार 345 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली. 

12 हजाराहून अधिक मजूर जिल्ह्यात दाखल 

दरम्यान पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारही आता जिल्ह्यात परतत आहेत. त्या प्रत्येकांची जिल्ह्यातील 19 चेकपोस्टवर सर्व तपासणी करुन तसेच प्रत्येकाच्या हातावर 28 दिवसांसाठीच्या होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारला जात आहे. आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षक, शिक्षक,पोलीस आदींची टीम प्रत्येक चेकपोस्टवर कार्यरत आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत 12 हजाराहून अधिक मजूर जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.