बीड | वार्ताहर
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज मंगळवारी (दि.21) रात्री उशिरा ( 11.29) वाजता (दि.20) रोजीच्या आदेशात काही बदल केले आहेत. त्यानुसार आता बीड जिल्ह्यात ई- कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवता येणार आहेत.तसेच त्यांना या कामासाठी आवश्यक ती परवानगी घेऊन वाहनेही वापरता येणार आहेत.
याबरोबरच यापूर्वी 20 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार कन्फेक्शनरी, फरसाण, मिठाई दुकाने उक्त ठिकाणी खाण्याची बैठक व्यवस्था नसावी हा आदेशही राज्य शासनाच्या 21 एप्रिलच्या सुधारीत आदेशानुसार वगळण्यात आला आहे .प्रिंट मीडियाला पण 20 एप्रिलपासून लॉकडाऊन मधून वगळण्यात आले असून आता घरपोहच वितरण करताना वर्तमानपत्र वाटणाऱ्याने मास्क घातला पाहिजे,सॅनिटायझर वापरावे आणि सामाजिक अंतर राखावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
Leave a comment