पिंपळवंडी । वार्ताहर
तालुक्यातील पिंपळवंडी येथील श्री क्षेत्र अश्वलिंग देवस्थान चा नवसाचा वळू (कठाळ्या) आहे. त्याचे जास्त वास्तव्य पिंपळवंडी बस स्टँड परिसरात असते त्याला भूक लागल्यानंतर तो गावातील अनेकांच्या घरासमोर तसेच हॉटेल, किराणा दुकान समोर जाऊन उभा राहतो. त्यावेळेस त्यास भाकरी खावयास घालतात. तर दुकानदार बिस्किटे चारतात हा त्याचा दररोज व नियमित उपक्रम सुरू आहे.
एक महिन्यापासून कोरोणाच्या महाभयानक विषाणूने जगात व राज्यात थैमान मांडले आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी आहे. कोरोणाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून किराणा दुकाना समोर ग्राहकासाठी उभे राहण्यासाठी ठराविक अंतराचे सोशलडिस्टसं तयार केले आहेत या नियमाचे ग्रामीण भागात पालन केले जात आहे. लॉकडाऊन व संचारबंदी दरम्यान असा दुर्मिळ योग पिंपळवंडी येथील एका मुक्या प्राण्या कडून पाहण्यास मिळाला. नेहमीप्रमाणे भुकेच्या अपेक्षेने वळू किराणा दुकाना समोर ग्राहकासाठी तयार केलेल्या सोशल डीस्टंट रिंगणात येऊन थांबला. त्यावेळी दुकानदाराने नेहमीप्रमाणे त्यास बिस्कीट खाऊ घातले बिस्किटे खाल्ल्यानंतर वळू मार्गस्थ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावरून असे स्पष्ट होते की कोरोणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत टाळेबंदी व संचारबंदीचे नियम सर्वजण पाळीत आहेत. त्याप्रमाणे मुके प्राणी माणसाप्रमाणे सोशल डिस्टन्ससिंगचे अनुकरण कोरोनाच्या पार्श्वूमीवर करीत असल्याचे यातून पाहावयास मिळाले.
Leave a comment