गेवराई । वार्ताहर
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निययमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मंगळवारी गेवराई शहरातील तीन दुकानदारांकडून रोख स्वरुपात दंड आकण्यात आला आहे. हि कारवाई गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत व कर्मचार्यांनी केली आहे. सदरील दुकानाच्या परिसरात सुरक्षित अंतर ग्राहकांमध्ये दिसून आले नाही. व पांढर्या रंगाच्या पट्टया मारलेल्या आढळून न आल्याने हा दंड आकारण्यात आला आहे.
गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत व कर्मचारी यांनी मंगळवारी सकाळी घेतली. सकाळी सात ते साडेनऊ दरम्यान बिघोत यांच्या पथकातील लोकांनी शहरातील किराणा दुकांनाना अचानक भेटी दिल्या. या दरम्यान तिरुपती, अर्जुन व नम्रता या तीन किराणा दुकानात व परिसरात ग्राहक व दुकानदारांमध्ये सुरक्षित अंतर दिसून आले नाही. तसेच दुकानासमोर पांढर्या रंगाच्या पट्टया मारलेल्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे वरिल तीन्हीही दुकानदारांना रोख स्वरुपात प्रत्येकी दोन हजार रुपये दंड करण्यात आला आहे. किराणा दुकानदारांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी सांगितले.तसेच ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाना चालू ठेवाव्यात असे देखील अवाहन बिघोत यांनी केले आहे.
Leave a comment