बीड । वार्ताहर

राज्य शासनाने ऊसतोड कामगारांना घरी जाण्यासाठी परवानगीचे नुकतेच आदेश काढले. या आदेशानुसार  ऊसतोड कामगार सुखरूपपणे घराकडे पोहोचू लागले आहेत.आज बीड जिल्ह्याच्या चौसाळा चेक पोस्टवर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व त्यांच्या सहकार्‍यांनी ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यांना भोजनाचे पॅकेट, मास्क, सॅनेटायझर चे वाटप केले. यावेळी त्यांच्या समवेत भगीरथ बियाणी डॉ.विक्रांत आजारी डॉ.लक्ष्मण जाधव शांतिनाथ डोरले, ऊसतोड कामगार संघटनेचे कृष्णा तिडके हे होते. 

साखर कारखान्यांच्या वतीने महिलांना एसटी महामंडळाच्या बस द्वारे प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. पुरुष, बैल आदी सामानां साठी ट्रॅक्टर व ट्रक च्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या टोळ्या स्वगृही परतू लागल्याआहेत. सुमारे दहा हजार ऊसतोड कामगार जिल्ह्यात परतले आहेत. स्वगृही जाण्याच्या आनंदामुळे ऊस तोड कामगारांच्या चेहर्‍यावरती आनंद फुलला होता. काही महिला ऊसतोड मजुरांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या भ्रमणध्वनीद्वारे ताईंशी थेट चर्चा करू त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोरोना पार्श्‍वभूमीवर देशव्यापी लॉक डाऊन चालू आहे लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. माणसांची आवक-जावक बंद झाली. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो ऊसतोड कामगार कारखान्याकडे अडकले होते. अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या ऊसतोड कामगारांना स्वतःच्या गावाकडे जाण्याची परवानगी मिळवण्याकरिता लोकनेते पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी शासन दरबारी प्रयत्नांचा पाठपुरावा करून अखेर परवानगी मिळवली. ऊसतोड कामगार हा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ राव मुंडे यांचा जीव की प्राण ते आज हयात नसले तरी लोकनेते पंकजाताई या ऊस तोड कामगारांवर जिवापाड प्रेम करतात. सदैव त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कुटुंब प्रमुखाची जबाबदारी चोखपणे पार पाडतात. कोरोना च्या जागतिक संकटातही पंकजा ताईंनी ऊसतोड कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी शासन दरबारी घेतलेले प्रयत्न आज फलदायी ठरले. गावी परतणारया प्रत्येक ऊसतोड मजुराच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. पंकजाताई मुळे आपल्या घरट्यात जात आहोत हा भाव त्यांनी व्यक्त केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.