सिरसाळा । वार्ताहर
कोरोनाचा गावात संसर्ग होवू नये म्हणून गाव रस्त्यावर लावलेले बांबू व दगड का काढले? या कारणावरुन रविवारी (दि.19) दोन गटात हाणामारी झाली. परळी तालुक्यातील सिरसाळा ठाणे हद्दीतील करेवाडी येथे ही घटना घडली. दोन्ही गटातील लोकांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून अठरा जणांविरूद्ध सोमवारी (दि.20) सिरसाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नामदेव विठ्ठल जाधव (रा. करेवाडी) यांच्या तक्रारीनुसार, ‘सार्वजनिक रस्त्यावर लावलेले बांबू व दगड का काढतात’ असे कारण काढुन आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व चापटानी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून रामभाऊ कावळे, अनिल कुकडे, राहुल काशिद, सुरेश कावळे, दादा गोरे, सुग्रीव गोरे, सचिन कावळे, बालाजी कावळे व विष्णु कुकडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.दुसर्या गटातील रामभाऊ कावळे यांनीही तक्रार नोंदवली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक रस्ता बांबू व दगड लावुन बंद केला असताना सरपंच नामदेव जाधव यांनी तो पुन्हा खुला केल्याने तुम्ही रोड खुला का केला? अशी विचारणा केली असता आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व चापटांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून नामदेव जाधव, नारायण काशिद, तुकाराम काशिद, ज्ञानेश्वर काशिद, अशोक घाटुळ, रंगनाथ शिंदे, महादेव जाधव, बाळु जाधव, शुभम काशिद (सर्व रा. कर्हेवाडी) यांच्यावरही सिरसाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार नागरगोजे हे करत आहेत.
Leave a comment