बीड  जिल्ह्यातील 17 स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित

बीड । वार्ताहर

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत सुरू असलेल्या धान्य वाटपाचा सविस्तर आढावा घेतला. या संकटकाळात स्वस्त धान्य दुकानदारांनी गोरगरिबांसाठी आलेले धान्य नियमांप्रमाणे वाटप करावे; कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशारा दिला आहे.प्रत्येक जिल्ह्यातील धान्य वाटपावर त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नियंत्रण ठेवावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना केल्या होत्या. त्यानंतर आज ना.मुंडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या धान्य वाटपाचा सविस्तर आढावा घेतला. 

निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये बीड तालुक्यातील सर्वाधिक - 5, माजलगाव - 3, गेवराई - 4, केज - 2, अंबेजोगाई -2 आणि शिरूर कासार - 1 असे एकूण 17 दुकाने समाविष्ट आहेत. मंजूर नियतनापेक्षा धान्य कमी देणे, पावती न देता धान्य कमी देणे अशा विविध तक्रारी या दुकानांविरुद्ध पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. पालकमंत्री ना मुंडे यांच्या सूचनेनुसार या तक्रारींची शहानिशा करून त्यांचे परवाने पुरवठा विभागाने निलंबित केले आहेत. एप्रिल महिन्यात मंजूर असलेले धान्य जवळपास पूर्ण वाटप झाले असून वाटपाबाबत विविध तक्रारी आलेल्या 17 दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच तक्रारदार ग्राहकाला मारहाण करणार्‍या गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी दिली.बीड जिल्हा पुरवठा विभागाकडे पुरेसा धान्य साठा असुन आगामी काळात लागणार्‍या धान्य पुरवठ्याबद्दल आपण अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा केली असून, जिल्ह्याबाहेरून येणार्‍या ऊसतोड कमगारांनाही धान्य नियतन वाटप करण्यात अडचण येणार नाही. तसेच मे व जून महिन्याचे धान्यही वेळेवर वाटप करण्यात येईल असे ना. मुंडे यावेळी म्हणाले. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.