किल्ले धारूर । वार्ताहर
कृषि उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूरच्या वतीने सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सदर कापूस खरेदी उद्यापासून दि.23 एप्रील 2020 पासून सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सदर कापूस खरेदी दि.23 एप्रील 2020 पासून सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत खरेदी करण्यात येईल. यापूर्वी दि.13 मार्च 2020 पर्यंत बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यात आलेल्या शेतकर्यांचे कापसाचीच खरेदी करण्यात येईल. तसेच ऋट दर्जाचाच कापूस केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे परिपत्रकानुसार स्विकारण्यांत येणार आहे. शेतकर्यांनी विक्रीस आणलेला कापूस हा काडी कचरा विरहीत आणावा. तसेच कापूस विक्री करतेवेळी अद्यावत 7/12 त्यांचे आधारकार्ड व बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत रहिवाशी प्रमाणपत्र. वर नमूद केलेली कागदपत्रे शेतकर्यांनी कापूस विक्री करताना आणावयाची आहेत.
आपला कापूस शेतीमाल विक्री करण्याकरिता बाजार समितीचे कर्मचारी श्री.बाबुराव काकडे- मो.9637616368, श्री.दयानंद वाघचौरे-मो. 9420653547 श्री.गणेश शिनगारे- मो 9890294053, श्री.ब्रम्हानंद उजगरे 9552498977, यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकर्यांना जिनींगवर कापूस आणण्यासाठी बाजार समितीकडून फोनद्वारे कळविण्यात येईल. बाजार समितीकडून फोन आल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत कापूस खरेदी केंद्रावर घेवून येवू नये नसता सदर कापूस स्विकारला जाणार नाही व मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार संबंधीतावर कठोर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.कापूस खरेदी केंद्रावर येताना स्वत: शेतकर्याने उपस्थित रहावे. तसेच चेहर्यावर मास्क लावूनच खरेदी केंद्रावर प्रवेश करावा, कापूस घेवून येताना स्वत: शेतकरी व गाडीचा ड्राईव्हर व्यतिरिक्त इतर अनावश्यक कोणासही सोबत आणू नये नसता नियमानुसार कारवाई करण्यात येईल, कापूस खरेदी केंद्रावर सोशल डिस्टन्स् चे काटेकोर पालन करावे. शेतकर्यांनी कापूस भरलेल्या वाहनावर अत्यावश्यक सेवा (कृषिमाल) असे स्टीकर लावावे. कापूस खरेदी बाबत असे आवाहन बाजार समितीचे सचीव दत्तात्रय सोळंके यांनी केले आहे.
Leave a comment