वडवणी । वार्ताहर
वडवणी येथील शिक्षक कॉलनी मध्ये लॉक डाऊनमुळे गोर-गरीब, मजूर, कारागीर यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन अतिशय विस्कळीत झालेले आहे. याचा विचार करून शिक्षक कॉलनी मध्ये काही ही शिक्षकांनी, समाजसेवकांनी व छोटे-मोठे व्यापारी यांनी एकत्र येऊन आवश्यक तेवढा निधी जमा केला आणि या निधीचा वापर वार्ड क्रमांक 04 मधील एकूण 50 गोर गरीब होतकरू, कारागीर व मजूर यांना दहा ते बारा किलो धान्य वाटप, भाजीसाठी बेसन पीठ, मीट पुडे, इत्यादी साहित्य दिले.
हे साहित्य देताना कोरोनाच्या पार्श्वभूमीचा विचार करता सोशल डिस्टन्स ठेवून व शक्य तेवढी काळजी घेऊन प्रत्येकाला हे धान्य वाटप करण्यात आले. हे धान्य वाटप करताना भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुग्रीव मुंडे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक शिवाजीराव मस्के, रामनाथ डोईफोडे अशोक मस्के सर, शिवदास तोंडेसर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अॅड.गदळे सर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घुगे, व्यापारी प्रभाकर वेदपाठक, तांदळे सर, शिवाजी मुंडे सर अशोक मस्के सर, मनोज मस्के, अनंत खाडे सर देशमुख सर, व डीसीसी बँकेचे संचालक परमेश्वरजी उजगरे, महाराणी ताराबाई चे मुख्याध्यापक राऊत डी.डी सर, अशोक लिमकर तसेच बाबासाहेब साळवे या सर्वांनी पुढाकार घेऊन हा एक स्तुत्य उपक्रम राबविला.
Leave a comment