आष्टी । वार्ताहर
भारत देश हा महाविशाल प्रदेश असून मोठी लोकसंख्या असलेला देश आहे कोरोना ही भीषण महामारी असून लोक डाऊन कालावधी हा कठोरपणे पालन करावा या काळात अडचणीच्या काळातील दीनदुबळ्या, भुकेल्या कुटुंबांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याप्रमाणे मदत करावी तसेच यापूर्वी त्यांनी उदार हस्ते मदत केली आहे त्या सर्व दानशूर व्यक्तींचे आपण आभार व्यक्त करतो आहोत असे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे चर्चा करताना ते बोलत होते.
या महामारीच्या काळात मजुरी करणारे हातावरील पोट असणारे परप्रांतीय मजूर यांचेसह अनेक कुटुंबे उपासमारीच्या मार्गावर असल्याने सर्व नागरिकांनी आपल्या कुवतीनुसार, इच्छेनुसार अन्नदान, किराणामाल, भाजीपाला या अडचणीतील जनतेला पुरवावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळेच कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात असून कमी प्रमाणात मृत्यू झालेले आहेत. आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य, किराणामाल, आणि भाजीपाला वाटप केला आहे. त्याचप्रमाणे या यंत्रणेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधव यांनी जीवापाड मेहनत केलेली आहे. त्या सर्वांचे आपण आभार व्यक्त करत असून यापुढचा काळ अति कठीण असून सर्वांनी स्वतःची आणि जनतेची काळजीपूर्वक सेवा करावी असे आवाहन आ.आजबे यांनी केले आहे.
मदतीचे श्रेय घेणे योग्य नाही
दरवर्षीप्रमाणे यावर्षी गळीत हंगामामध्ये ऊसतोडणीसाठी महाराष्ट्रभर गेलेले ऊस तोडणी कामगार गळीत हंगाम संपल्यानंतर परतीच्या मार्गावर असताना लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी अडवले गेले. काल शासनाने आहे तिथेच त्यांची राहण्याची खाण्याची सोय केली असताना त्यांना मदत केल्याचे श्रेय कोणीही घेण्याचे कारण नाही. मी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व मजुरांशी संपर्कात होतो सर्व संबंधित जिल्हाधिकारी, मंत्रीमहोदय, पोलिस यंत्रणेशी संपर्कात होतो. परंतु मी याचे श्रेय घेण्याचे कारण नाही माझे ते कर्तव्य समजतो. उगाचच कोणीही घेऊ नये असे आ.आजबे यांनी शेवटी सांगितले.
Leave a comment