नेकनूर मनोज गव्हाणे

एप्रिल-मे  या महिन्यात शेतीतील मशागतीची कामे पूर्ण करण्यावर शेतकर्‍यांचा भर असतो. आवश्यक असणार्‍या बैल जोड्या खरेदी करण्यासाठी बाजार बंद असल्याने शेतकर्‍यांची अडचण होत असली तरी मोबाईल व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी  खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे.

जूनच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात खरिपाची पेरणी पूर्ण करणे फायद्याचे असते यासाठी शेतीतील नागरण, मोगरणे, पाळी घालने या मशागतीच्या कामांना एप्रिल-मे या महिन्यांमध्ये  शेतकरी पूर्ण करण्यासाठी उन्हाचे चटके सहन करीत या कामांना प्राधान्य देतात यासाठी ट्रॅक्टर अथवा बैलांचा आधार घेतला जातो.काही शेतकरी मात्र शेतीतील ही मशागतीची कामे बैलाने चांगल्या पद्धतीने होत असल्याने या काळात बैलांना मागणी करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून बंद असलेले जनावरांचे आठवडी बाजार खरेदी विक्रीला अडचणीचे ठरले असताना अनेकांनी आधुनिकतेला सोबत घेत मोबाईलच्याआधारे व्हाट्सअप, फेसबुक या माध्यमाला खरेदी-विक्रीत स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे विक्रीसाठी असणार्‍या बैल जोड्या फोटो, संपर्कसह गावोगावच्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर होत आहेत. खरेदी करणार्‍यांना योग्य वाटल्यास लागलीच सदरील नंबरवर संपर्क साधत पुढील व्यवहार पूर्णत्वास जात आहेत. शेतीकामाला लॉकडाऊनमधून सुट असल्याने बैलांना जवळपास ने आण करण्यास अडथळा येत नाही यामुळे सध्यातरी बैलांच्या खरेदी-विक्रीसाठी मोबाईल मोठा दुवा ठरला आहे.

व्हाट्सअप,फेसबुकच्या माध्यमातून विक्रीसाठी असणार्या बैल जोड्यचे छायाचित्र संपर्कसह शेअर केले जाते. खरेदी करणारे यानंतर बैलांची जोडी दोन दात,चार दात,सहा दात, कडावर, जुळला यावरून वय ठरवत पुढील गणिते बांधतात यावरच व्यवहाराची औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आठवडी बाजार बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे. शेतकर्‍यांनी मशागतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मोबाईलचा आधार घेत आधुनिकतेची कास धरली असल्याचे पाहायला मिळते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.