विद्या जाधव-चौरे,विशाखा जाधव आणि संकल्प मदत ग्रुपचा अनोखा उपक्रम
बीड । वार्ताहर
बीड येथील संकल्प मदत ग्रुप मागील 19 दिवसापासून उपाशी राहणार्या गरजू कुटुंबियांना, पेशंटच्या नातेवाईकांना व निराधार लोकांना घरपोहच गरम जेवण देण्याचा निर्धार संकल्प मदत ग्रुपने केला आहे. त्यानुसार दररोज रात्री 300 कुटुंबियांना गरम जेवण देण्याची अवघड प्रकिया संकल्प मदत ग्रुप पार पडत आहेत. या ग्रुपच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत
आहे. कोरोना प्रतिबंधनात्मक उपाय योजनेमध्ये संपूर्ण देश पंतप्रधानांच्या आदेशानंतर लॉकडाउन करण्यात आला. यानंतर हातावर पोट असणार्या कुटुंबियांचे दुसर्या दिवसापासूनच बेहाल सुरु झाले.सुरवातीचा आठवडा कसाबसा गेला.पण नंतर खायचे काय असा प्रश्न अनेक घरामध्ये निर्माण झाला.उपाशी राहाण्याची वेळ अनेकांवर दुर्दैवाने आली.हि बाब लक्षात आल्यानंतर बीड येथील संकल्प मदत ग्रुपने स्वतःजेवण तयार करून भुकेलेल्याना जेवण देण्यास सुरवात केली.या संकल्प ग्रुपमध्ये जाधव व चौरे परिवार आणि सर्व मित्र परिवार यांनी सामाजिक भान ठेऊन मोठ्या मनानी संकल्प मदत ग्रुपला हातभार लावण्यास सुरवात केली.अवघ्या दोन ते तीन दिवसात सुमारे 50 ते 100 लोकांचे जेवण दररोज करून देण्यास सुरुवात झाली.संकल्प ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन सर्व मित्र परिवाराने पुढाकार घेऊन मदत करण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने विलास जाधव,बेबी जाधव,अशोक परळकर,अशोक चौरे ,वैभव जाधव,प्रशांत सुटले, रा.यु.जि. प्रा.विद्या जाधव-चौरे, अॅड.विशाखा जाधव,रोहिणी जधव,जयेंद्र (बबलू) चव्हाण ,नारायण डोईजड ,सुमन कुरुंद,गंगा तालखेडकर,अंजनाबाई चौरे,इंदू चव्हाण हे सर्व जण मिळून जेवण बनावण्यपासून ते घरपोहच वाटण्याची व्यवस्था करत आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Leave a comment