बीड । वार्ताहर
आज पूर्ण भारत देशामध्ये लॉक डाऊन असल्यामुळे आज या शाखेचा वर्धापनदिन थाटात साजरा करता येत नाही परंतु श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट ने पहिला रोपट १९ एप्रिल २०१३ रोजी बीड येथील परभणे इस्टेट,माळीवेस, सुभाष रोड, बीड येथे लावल. मुख्य शाखा सुरुवात केली संस्थेचे अध्यक्ष मा. श्री शाहिनाथ परभणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट आज याच रोपट्याचे वटवृक्ष झाला आहे आज श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट लि., च्या बीड जिल्ह्यासह इतर चार जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या एकूण एकोणवीस शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत या सात वर्षांमध्ये श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट ने राज्यस्तरीय 11 पुरस्कार प्राप्त केले आहेत. तसेच शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज पर्यंत पाच हजार विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत तसेच साईराम कृषिरत्न हाही पुरस्कार उत्कृष्ट शेतकरी बांधवांना देण्यात येत आहे. आज पर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना साईराम कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे या पुरस्कारा बरोबर शेतकऱ्यांना झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत प्रत्येक पुरस्कार सोबत फळाच्या झाडांचे रोपटे
देण्यात आलेले आहेत. आज श्री साईराम अर्बन मल्टी स्टेट च्या 19 शाखेमधून सामान्य व्यक्तीला,व्यापारी बांधव, नोकरदार वर्ग, छोटे-मोठे उद्योजक,शेतकरी बंधू,महिला उद्योजक,महिला बचत गट या सर्वांना आर्थिक सहाय्य करण्याचं काम करत आहेत. याचा प्रतिसादही आम्हाला चांगला मिळत असून एक समाजामध्ये श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे नाव झळकत आहे. आज 31 मार्चला श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट एकूण व्यवसाय 135 कोटी पूर्ण केला असून वार्षिक उलाढाल 1687 कोटी एवढी झालेले आहे त्यामध्ये संस्थेचे सर्व सभासद, खातेदार,ठेवीदार,हितचिंतक, मित्रपरिवार तसेच संचालक मंडळ सर्व कर्मचारी वृंद सर्व पिग्मी एजंट यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या परिश्रमामुळेच श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट अल्पावधीतच यशस्वी उंच भरारी घेत आहे. मुख्य शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांनी खूप खूप शुभेच्छा.
Leave a comment