योजनेतंर्गत मोफत तांदूळ वाटप
गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील सुशी (वडगाव) येथे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे सुशी येथील 140 कार्डधारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत सोशल डिस्टंस पाळत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात, तलाठी धारुरकर काका, ग्रामसेवक शेंडेकर टी.एस, स्वस्त धान्य दुकानदार बदाम पौळ, परमेश्वर उदागे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब उपाशी राहू नये या शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गेवराई तालुक्यातील सुशी येथे 140 कार्डधारक लाभार्थ्यांना शासन प्रणाली द्वारे सोशल डिस्टंस ठेवून प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. यासाठी दुकानांच्या बाहेर कोणतीही गर्दी होणार नाही याकरिता सोशल डिस्टंस राखण्यासाठी चौकटी आखण्यात आल्या होत्या. तर सोशल डिस्टंस ठेवून लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
Leave a comment