गेवराई । वार्ताहर
येथील संविधान बचाव संघर्ष समितीच्या तर्फे 200 लोकांना पोहच जेवण्याची उत्तम सोय सुरू असून गेवराई येथील संविधान बचाव संघर्ष समिती शाहीनबागचे अध्यक्ष अॅड,सुभाष निकम, दारलुम गेवराईचे मुफ्ती सय्यद मोईनुद्दीन कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून दिवसभर दोन वेळेस शहरातील विविध भागातील गोरगरीब, भटके, व रुग्णालयात दाखल उपचारार्थ तसेच कोणाचीही या संकटसमयी उपासमारी होऊ नये यासाठी जेवण तयार करण्यात येत असून, गरजू पर्यंत सोशल डिस्टेन्सीचे पालन करुन पोहोचविण्याचे व जेवणाची सोय केली जात आहे. लॉकडाऊन संपेपर्यत हे सामाजीक काम चालू राहणार आहे.
ग्रामीण भागातून आलेले रुग्ण व नातेवाईक गरजू लोकांचे हाल होऊ नये यासाठी गेवराई शहरा मध्ये उपजिल्हा रुग्णालयात, आधार हॉस्पिटल, कुलकर्णी हॉस्पिटल, माणीक हॉस्पिटल, नविन बसस्थानक व परिसराच्या ठिकानी गेल्या 26-27 दिवसा पासुन जेवन पार्सल पॅकिंग करून पोहचविण्यात येत आहे. सोशल मीडीया, फोटो व्हिडीओचा वापर न करत ही टिम अतिशय उत्तम कामगिरी करत आहे. शेख अमजत,सय्यद शाकेर,शेख अफसर,उस्मान शेख ,सय्यद निहाल, शोएब अतार,शाहीद बागवान,सय्यद फैजान व सहकारी आदीचा समावेश आहे.
Leave a comment