केज । वार्ताहर
संचारबंदी आणि लाँकडाऊनच्या काळात केज येथे मास्क न वापरता सार्वजनिक रस्त्यावरुन पायी व वाहनातून फिरणार्यां 900 नागरिकांना पोलीस आणि नगर पंचायतीचे कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने प्रत्येकी 500 रूपया प्रमाणे दंड आकारून दोन दिवसात 45 हजार रुपयाचा दंड वसूल केल्याची माहिती केज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
पो.नि. प्रदीप त्रिभुवन यांनी केज शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक,कानडी चौक,बसस्थानक परिसर आणि जयभवानी चौक या चार ठिकाणी कायम चेकपोस्ट कार्यरत ठेवले आहेत. यातच नगर पंचायत केजच्या वतीने मास्क न वापरणार्या विरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवस सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांवर करडी नजर ठेवली जात होती. या मोहिमेत दोन दिवसात 900 नागरीकांना प्रत्येकी 500 रूपया प्रमाणे दंडाची रक्कम आकारून ती वसूलही करण्यात आली. यासाठी निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे,उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, जाधव, उपनिरीक्षक अर्चना भोसले, जमादार अशोक नामदास,यांचेसह नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विशाल भोसले, दंड वसुली पथक प्रमुख आसद खतीब,अनिल राऊत ,भास्कर ससाणे ,गौतम हजारे,दादा हजारे ,यांचेसह इतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मास्क वाटप व समुपदेशन
तहसिलदार डी.सी.मेंढके,पोलीस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन ,मुख्याधिकारी विशाल भोसले ,नगरसेवक पशुपतीनाथ दागट प्रा हनुमंत भोसले,धनंजय देशमुख ,रामदास तपसे, संतोष सोनवणे, प्रवीण देशपांडे ,माजेद शेख, मजहर शेख ,डी.डी.बनसोडे,विजय आरकडे, धनंजय, अशोक सोनवणे कुलकर्णी,श्रावणकुमार जाधव, दिनकर राऊत, इत्यादींनी केजमध्ये मास्क न लावता फिरणार्यां नागरीकांनी दंडाची रक्कम भरताच त्यांना कोरोना या भयानक रोगाच्या संसर्गाचे गांभीर्य पटवून देऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या तोंडावर मास्क लाऊन त्यांना शिस्त व आरोग्याचे धडे दिले.
Leave a comment