एक महिन्यापासून पोलीसांच्या कचाट्यात
गेवराई । वार्ताहर
शहरातील धनगर गल्लीत घराच्या रस्त्याच्या वादात घरावर उभारलेली नवीन वर्षाची गुढी अद्याप उभीच आहे. या वादाची तक्रार नगर परिषद व गेवराई पोलीस ठाण्यात दिलेली आहे. परंतु सरकारी काम जरा थाम असल्यामुळे एक महिण्या पासून उभारलेली गुढी दारात उभीच आहे.
धनगर गल्ली येथील रहिवाशी संतोष धापसे यांचा घराचा वर्दळीचा रस्ता शेजारी राहणार्या व्यक्तीने आडवला होता. यासंबंधी धापसे यांनी ‘तू आमच्या घराचा रस्ता का अडवला,? आम्ही घरात कसे वागायचे ?’ असा प्रश्न केला. तेव्हा घराशेजारी राहणार्याने चार जणांसह घर मालक संतोष धापसे यांना जबर मारहाण व शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात 25 मार्च 2020 रोजी या प्रकरणी संतोष राजेंद्र धापसे यांच्या फिर्यादीवरुन नारायण विठ्ठल प्रभाळे,नागेश काकडे, पृथ्वीराज प्रभाळे अन्य एक महिलेवर गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी वाघमारे यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला.परंतु एक महिना उलटला तरी कसलीच कारवाई झालेली नाही. संबंधिताची तक्रार नगर परिषदमध्ये करण्यात आलेली आहे. परंतु एक महिना झाला तरी आरोपी घरावर गुढी पाडव्याला उभारलेली गुढी उतरु देत नाही. त्यामुळे नवीन वर्षाची गुढी पोलीसांच्या कचाट्यात अडकली आहे. हे प्रकरण निपटण्यासाठी घराकडे अद्यापही एकही अधिकारी फिरकलेला नसल्याचे धापसे यांनी सांगितले.
Leave a comment