आष्टी । वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग निमंत्रणासाठी तातडीच्मा उपाङ्गोजना अंतर्गत वैद्यकीम मंत्रसामुग्री व साहित्म खरेदी करण्मासाठी सोळा हजार एकशे एक रुपमांच्मा निधीचा धनादेश कृषी महाविद्यालमाचे प्राचार्म डॉ.श्रीराम आरसुळ मांनी आष्टीच्मा तहसीलदार निलिमा थेऊरकर मांच्माकडे सुपूर्द केला आहे.
माजी आ.भीमराव धोंडे व प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी व विद्यार्थी यांनी पैसे जमा करून सोळा हजार एकशे एक रुपये रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी तहसीलदार निलिमा थेऊरकर यांच्याकडे आष्टी तहसील कार्यालयात सुपूर्द करण्यात आला. कोरोनाफ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ यांनी केले आहे.
Leave a comment