किल्ले धारूर मुथ क्लबची मागणी
धारुर । वार्ताहर
किल्लेधारुर सामाजिक संस्थेच्या वतीने नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास हजारे यांना निवेदन देऊन किल्लेधारूर शहरांमधील सर्व भागातील नागरिकांची एप्रिल, मे, जून या तीन महिन्याची घरपट्टी व पाणीपट्टी व नगरपालिकेच्या मालकीच्या दुकानाचा किराया माफ करावा असे निवेदन देण्यात आले.
कोरोना प्रार्दुभावामुळे संपूर्ण लॉकडाऊन आहे. किल्ले धारूर शहरातील नागरिकही संकटाचा सामना करत आहेत. त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. दोनवेळचे पोट भरण्यासाठी सुद्धा त्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे. रोजगार, उद्योग धंदे, दळणवळण पूर्णतः बंद असल्यामुळे जगण्यावरचा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांची परिस्थिती हालाखीची आहे. यासाठी किल्ले धारूर शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी तसेच नगरपालिकेच्या मालकीचे दुकानाचा किराया माफ करावा म्हणून नगर परिषदेला निवेदन देण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा या कारणामुळे हैराण आहेत. त्यांचेही उद्योगधंदे, रोजगार,मजुरी पूर्णपणे बंद झालेले आहे. यासाठीच धारूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत हद्दीतील एप्रिल,मे,जून या तीन महिन्याची नळपट्टी आणि घरपट्टी माफ करण्यात यावी, यासाठी किल्ले धारूरयुथ क्लबच्यावतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी किल्लेधारुर क्लबचे सदस्य प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित होते. यामध्ये सुरेश शिनगारे, अविनाश चिद्रवार, सूर्यकांत जगताप, प्रा.नितीन शुक्ला, रवि गायसमुद्रे, नाथा ढगे हे सदस्य उपस्थित होते.
Leave a comment