महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसत आहे. गुरुवारपर्यंत ४२३ वर असलेली संख्या आता ४९० वर पोहचली आहे. आज ६७ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्राचं टेन्शन आणखी वाढलं आहे. महाराष्ट्रात
आज कुठे सापडले किती रुग्ण?
पुणे-९
नवी मुंबई-८
मुंबई-४३
पालघर-१
वाशिम-१
कल्याण-१
रत्नागिरी-१
एकूण ६७
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब मानली पाहिजे. स्वयंशिस्त पाळा, घराबाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या या आणि अशा अनेक सूचना दिल्या जात आहेत. तसंच करोनाचा रुग्ण आढळला की तो भाग सीलही केला जातो आहे. तरीही करोना रुग्णांची संख्या वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी आहे. अशात आता देशातलीही संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रातही लॉकडाउन आहेच. लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळा अन्यथा आज बाहेर फिरणारे उद्या रुग्णालयांमध्ये दिसतील असंही अजित पवार यांनी गुरुवारीच म्हटलं होतं. दरम्यान गेल्या २४ तासात महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ६७ ने वाढली आहे.
Leave a comment