गेवराई । वार्ताहर
देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराच्या बाहेर येता येत नसल्याने मॉ संतोषी अर्बनच्यावतीने ग्राहकांना घरपोच सेवा सुरू केल्याने संस्थेचे संजय भालशंकर यांचे कौतुक होत आहे.
खातेदाराची गर्दी पाहता अडीच तासाचा वेळ कमी पडत असल्याने खातेदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. ज्यांना शाखेत पैसे काढण्यासाठी येने शक्य होत नाही अशा खातेदारासाठी मॉ.संतोषी अर्बनने घरपोहच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेवराई शहरातील संतोषी अर्बनने कोरोणा व्हायरसच्या पार्क्षवभुमीवर सोशल डिस्टेटिंगचा नियम पाळत शाखेतील खातेदारासाठी घरपोहच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन काळात अशी सेवा देनारी राज्यात पहिलीच संस्था आहे.याचा फायदा शाखेतील खातेदारांना होनार आहे. पैसे काढण्यासाठी शाखेत जान्याची आवशक्ता भासनार नसुण फक्त एक फोन लावून खाते नंबर व नाव पत्ता किती रक्कम काढायची याची माहिती व्यवस्थापक यांना द्यायची आहे. लगेच एक कर्मचारी आपल्याकडे विड्रोल व रक्कम घेऊन आपल्या पत्यावर येनार आहे. आपण त्या विड्रोलवर सही नाव आकांउट नंबर टाकुन ती लागेच परत द्यायची आहे. कर्मचारी आपल्याला जागेवर रक्कम देणार आहे. ही सेवा केवळ लॉकडाऊनमध्ये बँकांना ठरवून दिलेल्या वेळेच्या शिथीले नुसार सोशल डिस्टेटिंग पाळुन शहर परिसरातील खातेदारांना मर्यादित वेळेत राहणार आहे अशी माहिती चेअरमन संजय भालशंकर यांनी दिली आहे.
Leave a comment