गेवराई : कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन केल्याने,हातावर पोट भरण्यासाठी गाव सोडून शहरात आलेल्या गोरगरीबांचे हाल होत आहेत. या नागरिकांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आलेत, पण मुक्या प्राण्यांनी कोणाला सांगावे ? असा यक्ष प्रश्न पडलेल्या जनावरांची मुकी हाक येथील काही प्राणी मित्रांना ऐकायला मिळाली. स्त्यावर फिरणारी जनावरांच्या जगण्याचा प्रश्न अवघड झालाय, दिवस भर फिरून ही काही खायला मिळत नाही. या अवस्थेत व्याकुळ झालेली ही मुकी जनावर चपाती घेऊन जवळ जाताच तुटून पडली.भुकेला जात नसते,धर्म नसतो हे खरंच आहे. सामाजिक बांधीलकी ठेवून काम करणारी माणस पाहीली की, नतमस्तक व्हायला होते. काही कार्यकर्त्यांनी मिळून जनावरांची काळजी घेतली असून शैलेश जाजू, डॉ धनंजय माने,संजू सेठ भालशांकर यांनी आज हा उपक्रम राबवला आहे.
Leave a comment