शिरूर कासार:
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झाला असून याचा परिणाम वृत्तपत्र व्यवसायातील अनेक घटकावर झाला आहे. पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तपत्र वाटप करणारी मुले, वृत्तपत्र विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक डाउनमुळे समाजातील अनेक घटकावर विपरीत परिणाम झाला असून त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वृत्तपत्र व्यवसाय देखील आर्थिक संकटात सापडला असून वृत्तपत्रसृष्टीत काम करणाऱ्या विविध घटकांचे हाल हाल आहेत. वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तपत्र वाटप करणारी मुले, वृत्तपत्र विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शिरुर (कासार) तालुक्यातील पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तपत्र वाटप करणारी मुले, वृत्तपत्र विक्रेते, आदी घटकांमधून ज्यांना घरात राशन नाही, अशा गरजवंतांनी तालुका पत्रकार संघाकडे नाव नोंदणी करावी. असे तालुकाध्यक्ष भारतकुमार पानसंबळ यांनी कळवले आहे.
Leave a comment