परळी । वार्ताहर

महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तालुका स्तरावर पोहचवले असून परळी शहरात आज नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांच्या हस्ते तीन शिवभोजन थाळी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.  शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरजूंची भूक भागवण्यास मदत होत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही योजना पोचवणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच परळीत कायमस्वरूपी कम्युनिटी किचन सुरू करण्याचा माणसही त्यांनी व्यक्त केला आहे. 

परळीत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राद्वारे लॉकडाऊनच्या काळात केवळ पाच रुपये प्रमाणे गरजूंना भोजनाचे डबे पुरवले जाणार असून प्रत्येक केंद्रातून 100 असे एकूण 300 डबे रोज पुरवले जाणार आहेत.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने राज्यात शिवभोजन थाळी चा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला ही योजना जिल्हास्तरावर होती. बीड जिल्ह्यातील हातावर पोट असणार्‍या नागरिकांची संख्या बघता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बीड जिल्ह्यात तालुका स्तरावर ही योजना सुरू करण्याबाबत विनंती केली होती; शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत बीड जिल्ह्यात शिवभोजन थाळी या मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात रविवारी परळीतून केली आहे. यामध्ये वैद्यनाथ मंदिर परिसरातील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील स्व. पंडित अण्णा मुंडे शेतकरी भोजनगृह आणि रेल्वे स्थानकासमोरील पंचवटी भोजनालय या तीन ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या वतीने परळीत आणखी तीन शिवभोजन केंद्र उभारणे प्रस्तावित असून एक कायमस्वरूपी कम्युनिटी किचन सुरू करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.