परळी । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ’नाथ प्रतिष्ठान’ व मुंबई येथील ’वन रुपी क्लिनिक’च्या माध्यमातून परळी मतदारसंघात नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग सुरू आहे. आज तिसर्‍या  दिवस अखेर परळी शहरातील एकूण 36 हजारहून अधिक नागरिकांची थर्मल टेस्टिंगच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.

थर्मल टेस्टिंगच्या तिसर्‍या दिवशी आज शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये हालगे गल्ली, गांधी मार्केट, हमालवाडी, हिंद नगर, भवानी नगर, विवेकानंद नगर, पोपळे गल्ली, स्वाती नगर, प्रेम प्रज्ञा नगर, जय नगर आदी भागांमध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन ही तपासणी करण्यात आली. आज तपासणीची सुरुवात परळीच्या नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांची प्रथम तपासणी करून करण्यात आली. रविवारी तिसर्‍या दिवशी एकूण 14650 नागरिकांची थर्मल टेस्टिंग करण्यात आली असून अगदी नगण्य स्वरूपात 14 नागरिकांना ताप सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना कोरोना चाचणीचा सल्ला दिला असल्याचे वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष चंदूलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, बाबासाहेब बळवंत, चेतन सौंदळे, जयपाल लाहोटी, पप्पू पाटसकर, देवेंद्र कासार, पिंटू सारडा, कुमार केदारी, कुमार व्यवहारे, नणेश जाजू यांसह आदींनी नागरिकांशी समन्वय साधून यशस्वी टेस्टिंग करून घेतले. या टेस्टिंगला मतदारसंघातून वरचेवर प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.