माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जाधव यांची भेट
बीड | वार्ताहर
बीड येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार आयूष) प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे या भेटीत मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच यावर योग्य निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले
केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी केंद्र सरकार ची योजना आहे,त्यानुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या 31 लाख असून आणखी एका वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत आवश्यकता आहे,सध्या एक हजार खाटा उपलब्ध असून बीड मधील रुग्णालयातील एकूण खाटांची संख्या लक्षात घेता बीड शहरात स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता आहे बीड जिल्ह्यात असलेल्या एका महाविद्यालयात म्हणजेच अंबाजोगाई येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असते त्यामुळे अनेक रुग्णांना लातूर किंवा संभाजीनगर या ठिकाणी जावे लागते बीड शहरात वैद्यकीय महाविद्यालयाची अत्यंत गरज असून हे महाविद्यालय व्हावे यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार आयूष ) प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली आहे,तसेच होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणामध्ये देखील अनेक अडचणी निर्माण होत असून या समस्या देखील सोडवण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली या सर्व मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री जाधव यांनी लवकरात याबाबत निर्णय घेणार असून या मागणीला त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
Leave a comment