गेवराई / अय्युब बागवान
: निवडणूका आल्या की, सर्वसामान्य जनतेच्या पायावर डोक ठेवून पाया पडणार्या आणि आता खरी गरज असताना, कागदावर आवहान करणाऱ्या नेत्यांनो.... जनतेच्या पोटाची भूक आग थांबवा....? असा आर्त टाहो भुकेने व्याकुळ झालेली जनता देऊ लागली आहे.
कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी सबंध देशभर लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे रोज काम करणा-या मजुरांचे ''अन्न धान्य'' अभावी हा ल होत आहे.गेवराईत ही गेल्या महिणाभरापासुन संचारबंदी लागू आहे. संचारबंदीमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था यांनी आपल्यापरीने अन्नदान व काही खाण्या-पिण्याच्या वस्तू गोरगरीब पालवाले,शेतमजुर यांना दिल्या परंतू या बंदच्या कालावधीमध्ये तालुक्यातील कोणताही राजकिय पुढारी मदत करण्यासाठी पुढे आला नाही. निवडणूक काळामध्ये पैश्याच्यां थैल्या घेवुन मला मदत करा म्हणत दारोदार मतांचा जोगवा मागत फिरणा-या या नेत्यांना अजुन तरी गोरगरीबांचे अन्नपाण्याविना हाल दिसत नसल्याने समाजामध्ये तिच्याविषयी मोठी चिड निर्माण होत आहे,घरबसल्या हे राजकिय नेते घरी बसा असे आवाहन करीत असले तरी अजुन खिशात हात घातला नाही,संकटाच्या या काळात हाताला काम नाही पोटाला भाकर नाही,लेकरा-बाळाच्या उपजिवेकाचा प्रश्न बिकट झाला,जनावरे जगवण्याचाही प्रश्न निर्माण झाला त्यात कोरोना विषाणू लागण होण्याची भिती हे सर्व गंभिर प्रश्न गरीबांसमोर आ वासून उभा आहेत.
सध्या राज्यात कोरोनाचे संकट ती्व झाले आहे. राज्यातील प्रशासन आणि सामन्य जनता कोरोनाशी ताकदीनं लढते आहे,सामान्य माणुस वेळप्रंसगी उपासमार सहन करतोयं पण या कठीण काळात कुरकुर करतांना दिसत नाही,विशेष म्हणजे ब-याच ठिकाणी असंख्य लोकांची अडचण निर्माण झाली आहे,अनेकांची गैरसोय झाली आहे.घरात अन्न-धान्य संपले आहेत,पण लोकं अतिशय संयमाने परिस्थीतीला सामोरं जात आहे. महसुल,पोलीस,आरोग्य कर्मचारी आणि सेवाभावी संस्था,सामाजिक कार्यकर्ते पुर्ण ताकदीनं कामाला लागली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अत्यंत संयमाने,जबाबदारीने राज्यातील जनतेला दिलासा देत आहेत. अनुभव नसतांना खुप चांगल्यापध्दतीने राज्यातील बिकट परिस्थीती हाताळत आहेत.गाजावाजा नाही,बडेजावपणा नाही,गोंगाट नाही,विनाकारण विरोधकांवर टिका नाही,चिकलफेक नाही सर्वसमावेशक भूमिका घेत खुप संमज्सपणे काम करत लोकांना धीर,दिलासा देत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गेवराई तालुका व शहरात महिण्याभरा पासुन लॉकडाऊन आहे, या लॉकडाउनमध्ये शहरातील गोरगरीब लोकांना कामा अभावी उपासमारीची वेळ आली आहे, थोडीफार मदत होत असल्याने त्यांचे उपासमारी टळली असली तरी जिल्ह्याचे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे,आमदार लक्ष्मण पवार,माजीराज्यमंत्री बदामराव पंडित,मा.आ.अमरसिंह पंडित, ज्यांना तालुक्यांने भरघोस मतं दिली ज्यांचा निसटता पराभव झाला ते विजयसिंह पंडित घरी बसून जनतेला बाहेर न निघण्याचे आवाहन करीत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये मतदारसंघात एका मतासाठी पुर्ण ताकद पणाला लावून प्रयत्न करणारे हे सर्व नेतेमंडळी शांत आहेत,गोरगरीबांच्या मदतीसाठी ज्यांनी पुढाकार घ्यावा ते मात्र बैठका व आवाहनाशिवाय काहीच करीत नाहीत,तालुक्यातील जनतेला आलेले राशन व्यवस्थित वाटप व्हावे म्हणून विद्यमान आमदार अॅड.लक्ष्मण पवार यांनी प्रशासनास सुचना केल्या,परंतु या सुचना गरीबांचे हाल रोखु शकत नाहीत.गेवराई मतदारसंघात काम करणा-या नेत्यांना गरीबांचे दुःख दिसेनात का? त्यांची परिस्थिती व सर्वसामान्य गरीबांचे हाल इतर लोकांना पहावत नाहीत,पण पुढा-यांना दिसेनात,नेत्यांच्या मनात आले तर पुर्ण मतदारसंघात यंत्रणा कामाला लागू शकते.''हीच ती वेळ'' आहे,गोरगरीब माणसांचे अश्रुं पोसण्याचे मा.आ.अमरसिंह पंडित यांना तर अपातकालीनमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे, त्यांचा शारदा प्रतिष्ठाण मोठे आहे,या प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन त्यांनी अनेक सामाजिकभिमुख कामे केली आहे,परंतु आज खरी गरज असतांना ते पण शांत आहेत,कोणताही लोकप्रतिनीधी,जि.प.सदस्य,पं.स.सदस्य, नगरसेवक स्वःताच्या खिशात हात घालायला तयार नाही देखावा का होईना आता तरी खिशात हात घालुन ''दानत'' दाखवावी, या नेत्यांनी ज्या लोकांनवर राजकारण केलं सत्ता भोगली यापुढेही राजकारण करणार आहेत.तेच आपले लोक आज संकटात सापडल्याने त्यांना मदत करणे हे नेत्यांचे कर्तृव्यच आहे,या कर्तृव्यापासुन दुर जाऊ नये नसता जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment