तहसीलदारांनी केली 32 ब्रास वाळू जप्त
माजलगाव | वार्ताहर
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त विक्री बंद असताना वाळू माफियांच्या टिप्पर व ट्रॅक्टरला डिझेल देणारा पम्प चालक कोण आसा प्रश्न आज तालुक्यात मोगरा येथे नदीपात्रात अवैध वाळु उत्खनन करून तीन ठिकाणी केलेला 32 ब्रास वाळु साठे जप्तीची कारवाई तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी केल्यावर सर्व सामन्यांना पडला आहे.शेतकरी,मेडिकल दूध विक्रेते यांना पेट्रोल डिझेल देताना ते जणूकाही चोर आहेत अशी वागणूक देताना नेमका वाळू चोरांना डिझेल देणारा पम्प चालक कोण आहे याचा शोध लावण्याचे आवाहन तहसीलदार यांच्या समोर आहे
माजलगाव तालुक्यातील गोदाकाठच्या गावांमधून दररोज वाळु तस्करी सर्रासपणे सुरू आहे.अशा माफियांच्या टोळ्या गावोगावी झाल्या आहेत. या पैकी काही माफियांनी मोगरा गावात संगनमताने दिवसरात्र अवैध वाळूचे उत्खनन सर्रासपणे करून व साठा करून विक्री करण्याचा सपाटा सुरू होता. या परिसरात शेतातही वाळूचे अवैध मोठे साठे करण्यात आलेले आहेत हा प्रकार संगनमताने सुरू असल्याने त्यातून माफिया मोठी उलाढाल करत. एक टिप्पर 40 ते 45 हजार रुपयांना विक्री होत आहे.
बाबत माहिती मिळताच तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी शनिवारी मोगरा येथे जाऊन शिवाजीनगर तांडा, दलित वस्ती, व एका शेतातील पाहणी केली असता या तीन ठिकाणी झाडाझुडुपात दडवलेले वाळु साठे आढळून आले. त्याचा मंडळ अधिकारी विकास टाकणनखार,तलाठी सवई यांनी पंचनामा केला व रविवारी 32 ब्रास जप्त वाळु माजलगाव तहसील कार्यालयात आणण्यात आली. मागील महिन्यात 9 मार्च रोजी याच ठिकाणी उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर यांनी अवैध वाळू उत्खनन करणारे 2 टिप्पर व मशीन जप्तीची कारवाई केली होती तरीदेखील येथे वाळू उपसा सुरूच होता. याच प्रमाणे गुजरवाडी, शिंदेवाडी येथे ओढ्यातून ट्रॅक्टरद्वारे वाळु उपसा तक्रार देऊनही सुरूच आहे. या ठिकाणी प्रशासन केव्हा कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Leave a comment