अंबाजोगाई (प्रतिनिधी) वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून न्यु व्हिजन पब्लिक स्कूलने लॉकडाउनच्या काळात "शाळा आपल्या घरी" हा अनोखा उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांशी संवाद कायम ठेवला आहे.संचारबंदी काळात विद्यार्थी अभ्यासात मग्न असल्याने पालक वर्गातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कूलने दिनांक 17 मार्च 2020 पासून सर्व विद्यार्थ्यांशी शाळेच्या माध्यमातून संपर्क कायम ठेवला आहे.कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर आणि या आपत्तीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांसह पालकांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांना सतत कार्यमग्न ठेवण्यासाठी सी.बी.एस.ई.बोर्डाच्या निर्देशाप्रमाणे न्यु व्हिजन पब्लिक स्कूल विविध अभिनव उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहे.न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सातत्याने विविध उपक्रम राबवित असते.दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी समरकॅम्पचे आयोजन करण्यात येते.परंतू,यावर्षीच्या उन्हाळ्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जरी विद्यार्थ्यांचे अध्ययन थांबले होते.परंतु,संपर्क व संवाद कायम होता.या बाबींचा विचार करून न्यु व्हिजन पब्लिक स्कूलने सर्व शिक्षकांच्या मदतीने इयत्ता
6 वी ते इयत्ता 12 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि भाषा विषय या विषयाचे पाठयपुस्तकांतील धडे थेट त्यांच्या मोबाईलद्वारे गिरवता येत आहेत.न्यु व्हिजन पब्लिक स्कूलच्या आय.टी.विभागाकडून फेसबुक लाईव्ह,यु टयूब लाईव्ह तसेच शाळेचे शिक्षक हे अत्याधुनिक डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे अध्यापन करत आहेत.रोज नवीन घटकांवर अध्यापन होत असल्याने विद्यार्थी आनंदी तर पालक वर्ग खुप समाधानी आहे. शिक्षकांकडून अतिशय सोप्या पण,प्रभावी पध्दतीने व्हिडीओ बनविण्यात येत असल्याने दर्जेदार शिक्षण पध्दतीचा वापर केला जात आहे.कुठल्याही परिस्थितीत हार न मानणे आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अध्ययनापासून दुर न ठेवणे हाच उद्देश न्यु व्हिजन पब्लिक स्कूलने सतत ठेवला आहे.यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी,मार्गदर्शक प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,प्रा.वसंतराव चव्हाण,संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी,प्राचार्य रोशन पी.नायर,विनायक मुंजे यांचे सतत मार्गदर्शन लाभत आहे.
विद्यार्थ्यांना नेहमीच नवनवीन उपक्रम देण्याचा प्रयत्न
अंबाजोगाईतील पहीली सी.बी.एस.ई शाळा म्हणून मागील 15 वर्षांपासून कार्यरत असलेली शाळा म्हणून न्यु व्हिजन पब्लिक स्कूल या शाळेने नेहमीच अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांना नेहमीच नवनवीन उपक्रम देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच जानेवारी महीन्यांत अंबाजोगाई व परीसरातील
इयत्ता आठवी ते दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिजन टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केले होते. आजच्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना अध्ययनात नवीन तंत्रज्ञानांचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. आजचा विद्यार्थी हा 21व्या शतकातील विविध डिजीटल ज्ञानाने अवगत आहे.या शाळेत सुरवातीपासूनच ई-लर्निंग सहीत सर्व आधुनिक शैक्षणिक सोयी व सुविधा प्रत्येक वर्गात पुरविण्यात आल्या आहेत.कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्याच घरात वर्गातील अध्ययनाचा अनुभव आमच्या शाळेतील तज्ञ शिक्षक त्यांच्या ऑनलाईन अध्यापनातून देत आहेत.विद्यार्थ्यांना नुसते अध्यापनच नाही तर एन.सी.आर.टी.च्या वेबसाईट वरील पी.डी.एफ.पुस्तके डाउनलोड करून त्यांना तशा लिंक पाठविल्या जातात.
-संकेत राजकिशोर मोदी (कार्यकारी संचालक,न्यु व्हिजन पब्लिक स्कूल,अंबाजोगाई.)
Leave a comment