गेवराई : वार्ताहर
गेवराई शहरात कार्यरत असलेल्या जगदंबा महिला पतसंस्थेच्या वतीने शनिवार दि.१८ रोजी बालाग्राम अनाथालयातील अनाथ मुलांच्या उपजिविका भागवण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून १५ हजार रुपयांचे किराणा सामान देण्यात आले. कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात अनाथ मुलांना मदत व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
देशात कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आहे. दरम्यान या काळात हातावर पोट असलेल्या गरजू आणि गरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनलेला आहे. त्यांच प्रमाणे बालाग्राम अनाथालयात राहणाऱ्या अनाथ मुलांचाही उदरनिर्वाह चा प्रश्न बिकट झाला आहे. याची दखल घेऊन गेवराई शहरात सावता नगर भागात असलेल्या जगदंबा महिला पतसंस्थेच्या वतीने शनिवार दि.१८ रोजी गोविंदवाडी येथील बालाग्राम अनाथालयास १५ हजार रुपयांचे किराणा साहित्य यात गहु, तांदूळ, शेंगदाणे, चहापत्ती, मसाला, गोडेतेल, मीठ, जिरे, मोहरी, हळद या जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले. यावेळी जगदंबा महिला पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के, प्रा.बाबु वादे, राम कु-हाडे, रवि काळे, भगवान अंतरकर,बाबासाहेब मस्के.अशोक मस्के यांची उपस्थिती होती.
Leave a comment