आष्टी : प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कडा येथील पाथर्डी रोड वर असलेल्या नंदकिशोर विलास जाचक यांच्या मालकीच्या गार्गी फ्रोजन फूडूस अँड आईस्क्रीम या कोल्ड कृंच आईस्क्रीम कंपनीला शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून
आतील विविध मशनरी जळल्या आहेत.
कडा येथील सुशिक्षित युवक नंदकिशोर जाचक यांनी मोठी गुंतवणूक करून गेल्या वर्षी कडा सारख्या ग्रामीण भागात आइस्क्रीम फॅक्टरी सुरू केली होती. यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरोना प्रादुर्भावामुळे फॅक्टरी सध्या बंद आहे. शनिवारी सायंकाळी या आईस्क्रीम कंपनीतून अचानक आगीचे लोळ बाहेर पडताना पाहून परिसरातील नागरिकांनी आपल्या घराबाहेर येऊन आग विझवण्यास मदत केली. यामध्ये सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात कड्यात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी कडा कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या आवारात अचानक आग लागून 20 टन कापूस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चौकट : संपूर्ण कडा शहरामध्ये शनिवारी दिवसभर विज पुरवठा दुरुस्ती साठी बंद होता. सायंकाळी सहा वाजल्यानंतर विज आली असून नेमकी आग त्याचवेळी लागली.मग आग शॉर्टसर्किटने लागली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे..
Leave a comment