नांदूरघाट । श्रीकांत जाधव
वाघेबाभूळगाव येथील मध्यम प्रकल्प हा बर्याच गावांना वरदान ठरतो. पिण्याच्या पाण्याचे अनेक योजना प्रत्येक ग्रामपंचायतीने राबवलेल्या आहेत. त्यामध्ये या वर्षी पाऊस काळ कमी असल्याकारणाने तीस ते पस्तीस टक्के तलाव भरला होता. त्यात या प्रकल्पामधून अनेक गावांना पिण्याचे पाणी जाते जर या तलावांमधील पाणी अवैध उपसा होतच राहिला तर खूप गंभीर समस्या होणार आहे. काही दिवसापूर्वी बातम्या प्रकाशित करून देखील कारवाई होत नसल्या कारणाने लोक हैराण झाले आहेत. अशा महत्त्वाच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल देखील सर्वसामान्यांना पडत आहे.
वाघेबाभूळगाव येथील मध्यम प्रकल्पात पाणीसाठा अल्पसा राहिल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये उर्वरित पाणीसाठा तरी प्रकल्पांमध्ये राहावा अन्यथा पाणी प्रश्न बिकट होण्यास कोणीही रोखू शकणार नाही, आजूबाजूच्या पंधरा ते वीस गावातून या प्रकल्पामधून जे होत असलेली अवैध पाणी उपसा थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे,त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी जेणेकरून पाणी उपसा थांबेल व मध्यम प्रकल्पावर कुणाचे निरीक्षण आहे. त्या संबंधित अधिकार्यांना नेमके ते काय काम करत आहेत, त्यांच्या या ड्युटीमध्ये असा अवैध उपसा होत असेल तर प्रकल्पावरील अधिकारी काम करतात की नाही किंवा येतच नाहीत. असा सवाल देखील सर्वसामान्यांच्या मनामध्ये होताना दिसत आहे.
--------
Leave a comment