माजलगाव:| उमेश जेथलिया
बेफिकीर नागरिकांवर प्रशासनाची कृपा अशी बातमी दैनिक लोकप्रश्न च्या पोर्टल वर काल आल्यानंतर तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे यांनी दखल घेऊन तात्काळ न प कर्मचाऱ्यांची बैठक काल बोलावली आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले.त्याचा परिणाम आज सकाळपासून दिसून आला.शहरातील शिवाजी चौक, आंबेडकर चौक,संभाजी चौक येथे नगरपालिका कर्मचारी सकाळीच पावती बुक घेऊन बसले होते.संचारबंदीत अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणारा वर दण्डत्मक कारवाईस सुरुवात झाली.न प च्या कर्मचारी वर्गाचे सुज्ञ नागरिक अभिनंदन करत आहेत
उद्या सकाळी 7 ते 9.30या संचारबंदी शिथिलतेच्या काळात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकान उघडल्यास, किराणा दुकानावर भावफलक नसल्यास,18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्षापेक्षा वयाने मोठ्या व्यक्ती आरोग्य सेवेव्यतिरिक रस्त्यावर दिसल्यास,मोटरसायकल रस्त्यावर दिसल्यास,मास्क न लावणाराना व रस्त्यावर थूंकणारवर दण्डत्मक कार्यवाही करण्यात येईल तीच व्यक्ती दुसऱ्या वेळी आढळून आल्यास फोजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे यांनी दै लोकप्रश्न शी बोलताना सांगितले
Leave a comment