बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह असलेला एक रुग्न अहमदनगरला आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य प्रशासन आवश्यक ती सर्व उपायोजना आणि खबरदारी घेत आहे. सध्या बीड जिल्ह्यात 118 जणांचा होम क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण झाला, त्यामुळे गुरुवारपर्यंत बाहेर जिल्ह्यातून आलेले 56 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 109 जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. याशिवाय गुरुवारी सायंकाळपर्यंत दहा जण आयसोलेशन वार्डमध्ये आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातून पाठवल्या 142 पैकी 141 रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आलेले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.
नाथरा गावातील त्या संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह
परळी तालुक्यातील रहिवासी असलेलले आणि आळंदी वरून परतलेल्या कुटुंबाचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.एल.मोरे यांनी दिली आहे.आळंदी येथे उपचारासाठी गेलेले हे कुटुंब गावात परतले होते. खबरदारी म्हणून गावकरी आणि प्रशासनाने कुटुंबाला कोरोना चाचणीचा आग्रह धरला, त्याला प्रतिसाद देत संपूर्ण कुटुंब अंबेजोगाईला पाठवण्यात आले होते. तिथून स्वैबचे नमुने औरंगबाद येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. ते पाचही अहवाल प्राप्त झाले ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला.
Leave a comment