गेवराई । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील सिंदखेड येथील तुळजाभवानी मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना बुधवारी (दि.15)रात्री घडली.
गेवराई तालुक्यातील सिंदखेड येथे हेमांडपंती तुळजाभवानी देवी मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी अष्टमीला मोठी यात्रा भरते. मात्र यावर्षी सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र देशभरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे सर्व यात्रा, जत्रा, उरूस, जयंती, यासह सर्व सार्वजनिक कार्यकम रद्द करण्यात आले आहेत. सिंदखेडची प्रतिवर्षी ची यात्रा रद्द करण्यात आली होती.पण भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनाला येऊन आपआपले गुपित दान दानपेटीत जमा केले होते. पण बुधवारी रात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या तुळजाभवानी देवी च्या मंदिराची दानपेटी चोरून नेल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. सकाळी काही गावकरी दर्शनासाठी मंदिरात आले असता. त्यांना ही घटना निदर्शनास आली.त्यांनी तात्काळ पोलीसांना माहिती दिली. काही वेळात श्वानपथक, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.दानपेटीतील किती मुद्देमाल गेला आहे आहे हे अद्याप कळलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a comment