गेवराई । वार्ताहर
कोरोनो नांवाच्या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असेलेल्या अनेक कुटुंबाची उपासमारी होत आहे. त्यामुळे शासनाने केशरी कार्डंधारकांना 8 रू. कि. दराने माणसी 3 कि. गहू प्रति व्यक्ती तर 12 रू दराने प्रति व्यक्ती एक किलो तांदुळ, अशा पध्दतीने प्रत्येक केशरी कार्डंधारकांना स्वस्त धान्य वाटप करण्यात येणार आहे. पण केशरी कार्डंधारकांची स्वस्तधान्य दुकानाला नोंदच नाही. म्हणून शासनाने घोषीत केलेले धान्य सदरील केशरी रेशनकार्ड धारकांना मिळवण्यासाठी स्वस्त धान्यदुकानदार कारण दाखवू शकतो. त्यामुळे केशरी कार्डंधारकांची तो रहात असलेल्या भागातील स्वस्त धान्य दुकानाला जोडून स्वस्तधान्य दुकानाला किती माल लागेल यांची माहिती होऊन सदरील कार्डंच्या संख्येनुसार सदरील दुकानादांना चलन भरून घेऊन धान्य वितरण करण्यात सोपे जाईल व दुकानदार सुध्दा केशरी रेशनकार्डधारकांना अडवणार नाही म्हणून गेवराई तहसील कार्यालया मार्फत केशरी रेशनकार्डधारकांना रहात असलेल्या भागातील स्वस्तधान्य दुकानला नोंद घेऊन सदरील कार्डंधारकांना धान्याचा लाभ मिळवून द्या अशा सुचना आ.लक्ष्मण पवार यांनी तहसीलदार व पुरवठा आधिकारी यांना करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना आ लक्ष्मण आण्णा पवार म्हणाले की गेवराई विधानसभा मतदार संघातील अनेक गावांतील ग्रामस्थांना रेशन कार्ड नव्हते म्हणून अनेक कुटुंबाना शासकीय कामात अडचणी निर्माण होत होती म्हणून आपण स्वतःहा लक्ष देऊन आपल्या कार्यालया मार्फत गरजूंना केशरी रेशनकार्ड देण्यासाठी एक शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी गेवराई विधानसभा मतदार संघातील हजार गरजूंना केशरी रेशनकार्ड तहसील कार्यालया मार्फत वाटप करण्यात आले होते. तर अनेक लोकांनी स्वतःहा केशरी कार्ड घेतलेले आहेत पण त्यांची स्वस्त धान्य दुकानाकडे नोंदच म्हणून अशा कार्डधारकांची स्वस्तधान्य दुकानला नोंद घेऊन सदरील कुटूंबाला लॉकडाऊनच्या काळात शासनाने मे व जुन महिन्यात धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकही केशरी कार्डंधारक धान्या पासून वंचित रहावू नये यांची दक्षता आधिकार्यांनी घ्यावी, अशी सूचना आ.लक्ष्मण पवार यांनी तहसीलदार व पुरवठा आधिकारी यांना देण्यात आली आहे.

Leave a comment