बीड । वार्ताहर
कोरोना संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे यांनी पीएम निधीसाठी पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे.
बीड जिल्हयाचे भूमीपूत्र असलेले डॉ.अशोक कोल्हे हे सेवानिवृत प्रशासकीय अधिकारी आहेत. सध्या ते नगर जिल्ह्यातील प्रवरानगर (लोणी) येथील प्रवरा ग्रामीण इज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, लोकसभा निवडणुकी दरम्यान डॉ.अशोक कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाच्या माध्यमातून डॉ.कोल्हे जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करीत आहेत. बीडच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनानंतर, बीड येथील भाजपाचे कार्यकर्ते भगीरथ बियाणी यांच्याशी चर्चा केल्यानंतर, डॉ.अशोक कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम फंडासाठी पन्नास हजार रुपायाचा धनादेश दिला. भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.सुजेय विखे पाटील, खा.प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करीत असून, कोरोनाशी लढा देताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही डॉ.अशोक कोल्हे यांनी केले.
Leave a comment