आष्टी । वार्ताहर
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसणे थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवल्याने लोकांना जीवनावश्यक वस्तू जागेवर कशा देता येतील यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे शेतकरिपुत्र आ. बाळासाहेब आजबे यांच्यावतीने आष्टी पाटोदा शिरूर शहरासह ग्रामीण भागातही गरजू व गरीब कुटुंबांसाठी मोफत भाजीपाला वाटप करण्यात येत आहे, 15 एप्रिल रोजी आष्टी शहरातील पोलीस कॉलनी येथून हा भाजीपाला वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, डीवायएसपी लगारे साहेब ,पोलीस उपनिरीक्षक माधव सूर्यवंशी,नायब तहसीलदार तथा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी शारदा दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे, माजी सरपंच डॉक्टर जालिंदर वांढरे, हे उपस्थित होते दररोज चार ट्रॅक्टर मधून हा भाजीपाला वाटप करण्यात येणार आहे शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदार संघातीलच शेतकर्यांकडून भाजीपाला विकत घेऊन तो मतदारसंघात मोफत वाटण्यात येत आहे, त्यामुळे एकीकडे शेतकर्यांचा भाजीपाला पडून राहत नाही तर दुसरीकडे गरजवंतांना तो मिळत आहे. शेतकर्यांनी पिकवलेला भाजीपाला वाया जाऊ नये त्यांनाही दोन रुपये मिळाले पाहिजेत, शेतकरी ही अडचणीत येणार नाही म्हणूनच मतदारसंघातील भाजीपाला विकत घेऊन तो गोरगरीब, गरजवंत जनतेस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले.
Leave a comment