बीड । वार्ताहर
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बीड जिल्हा पोलीसांना गुरुवारी (दि.16) सुरक्षा साहित्य वितरित करण्यात आले. या कीटमध्ये एन 95 मासक, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर व फॉग मशीनसह शिल्ड मास्कचा समावेश आहे. महत्वाचे हे की, फील्डवर काम करणार्या 52 वर्षापेक्षा अधिकचे वय असणार्या अधिकारी-कर्मचार्यांना फेस शिल्ड मास्क देण्यात आले आहे.कर्तव्यावर अत्यंत काळजीपुर्वक खबरदारी घेवून सुरक्षा साहित्याचा वापर करुन कर्मचार्यांनी कर्तव्य बजवावे अशा सूचनाही एसपींनी दिल्या आहेत.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, अंबाजोगाई अप्पर अधीक्षक स्वाती भोर, यांच्या मार्गदर्शनातून सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी यांच्याकडून जिल्ह्यात सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले. बीड जिल्ह्यातील पोलीसांसाठी हॅन्डग्लोज 350, एन-95 मास्क-1225, साधे मास्क-790 व 1050 शिल्ड मास्क तर जिल्ह्याच्या हद्दीवर नेमण्यात आलेल्या चेकपोस्टसाठी प्रत्येकी तीन बॅरीकेड कायमस्वरुपी दिले गेले असून एकुण 10 पोलीस ठाण्यांमध्ये 30 बॅरिकेड पुरवण्यात आली आहेत. याशिवाय जिल्ह्यातील चेकपोस्ट नाके निर्जंतुकीकरणासाठी एक फॉग पशीन व सोडियम हायड्रोक्लोराईड सॅनियायझर पाठवण्यात आले आहे.
आयसोलेशन वार्ड नेमणूकीवरील पोलीसांना पीपीई कीट
बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या आयसोलेशन (विलगीकरण कक्ष) वार्ड परिसरात नेमणूकीवर असणार्या पोलीसांसाठी 10 पीपीई कीट (पर्सनल प्रोटेक्शन सुटही देण्यात आले. यात बीड शहर व अंबाजोगाई शहर पोलीसांना प्रत्येकी 5 सुटचा समावेश आहे. तसेच अंभोरा ठाण्याच्या कंटेन्टमेंट झोनसाठी प्रत्येकी 40 एन-95 मास्क, हॅन्डग्लोज जोडी व फेस शिल्ड मास्क असे सुरक्षा साहित्य पुरविण्यात आले आहे.
Leave a comment