आष्टी : वार्ताहर
आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील एका कापूस आडत दुकानास आग लागुन जवळपास वीस टन कापूस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नितीन चानोदिया यांचे गेट क्रमांक एक वर भुसार माल खरेदी विक्रीचे दुकान असून ते कापुसही खरेदी करत आहेत.लॉकडाऊन मुळे बाजार समिती सकाळीच सुरू होत असुन दुसऱ्या फेऱ्यातील वेचणीचा कापूस बाजारात येत आहे .गुरुवारी दुपारी अचानक कापसाच्या ठिगाऱ्यास आग लागल्याचे हमाल लोकांनी पाहताच आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी आष्टी नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या गाडीस बोलवून आग आटोक्यात आणली.मात्र तोपर्यंत जवळपास वीस टन कापूस जळुन खाक झाला होता.सुदैवाने आष्टी नगरपंचायतने अग्निशमन दलाची गाडी आणल्याने मोठी दुर्घटना टळली.आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
16
Apr
Leave a comment